Sangram Jagtap Controversy : आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी पक्षानं बजावली नोटीस

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे, तर दुसरीकडे काका-पुतणे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच बैठकीत एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा', असे अत्यंत वादग्रस्त विधान आमदार संग्राम जगताप यांनी एका कार्यक्रमात केले होते. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. केवळ नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (Vasantdada Sugar Institute) होणाऱ्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार साखर कारखान्यांच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत. दरम्यान, भाजपने देखील नवी मुंबई, ठाणे आणि कोकण विभागात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी इतर पक्षांतील नेत्यांसाठी पक्षात प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola