Sangram Jagtap : हिरवे साप फणा काढतील, त्यांना ठेचण्याची वेळ आलीय, संग्राम जगतापांचं वक्तव्य
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 'हिरवे साप फणा काढतील, त्यामुळे त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे,' असे खळबळजनक वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. विशेष म्हणजे, पक्षाची भूमिका डावलून केलेल्या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही जगताप यांनी हे विधान केले आहे. जगताप यांच्या पूर्वीच्या, 'दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा' या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने नोटीस देऊनही जगताप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement