Sangram Jagtap Controversy: जगतापांच्या वक्तव्याने वाद, अजित पवार कारवाई करणार?

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि MIM नेत्यांचा 'बोकडं' असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नाही,' असे म्हणत जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर स्पष्टीकरण देताना जगताप यांनी दावा केला की, ईदच्या वेळी मुस्लिम समाजानेच त्यांच्याकडून खरेदी करण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली होती. अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सवात जाणीवपूर्वक फलक लावल्याचा आणि रस्त्यावर गोमांस ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या नोटिशीनंतरही जगताप यांची भूमिका कायम असून, ते शिर्डीत हिंदू समाजाच्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, ज्यामुळे ते पक्षाच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola