Hunger Strike: 'सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला जागं करण्यासाठी उपोषण', Rohit Pawar आक्रमक

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मागणीसाठी देहू (Dehu) येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. 'सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे उपोषण आहे,' असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरासमोर करण्यात येत असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी आहे. पवार यांनी संत तुकाराम महाराजांनी सावकारीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून कर्ज माफ केल्याच्या इतिहासाची आठवण करून दिली. या आंदोलनाला देहूचे माजी सरपंच मधुसराव कंठपाटील यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola