शिवरायांना हार घालण्यासाठी NCP MLA Raju Navghare थेट पुतळ्यावर, वादग्रस्त व्हीडिओनंतर रडू कोसळलं

Continues below advertisement

हिंगोली : वसमत शहरातील बहुप्रतिक्षीत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अखेर वसमत शहरात दाखल झाला.  तेव्हा हा पुतळा ट्रकमध्ये असल्यामुळे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी  अश्वावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केला आहे.  हा  व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि आमदार नवघरे यांच्यावर टीका झाली आहे. त्यानंतर आपली चूक लक्षात येतात त्यांना अश्रू अनावर झाले आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर  आमदार राजू नवघरे यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार  नवघरे यांना रडू देखील कोसळले. "मी एकट्यानेच पाप केले असेल तर मला फाशी द्या.  अनेक जण माझ्यासोबत शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढलो तर टीकेची झोड माझ्यावरच का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. "माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा",  अशा शब्दात राजू नवघरे यांनी सर्व शिवप्रेमींची माफी सुद्धा मागितली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram