Maharashtra Politics: '१५ जानेवारीला मतदान होणार', Dilip Walse Patil यांनी निवडणुकांच्या तारखाच जाहीर केल्या
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकांचं मतदान होणार असल्याचा दावा' दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकृत घोषणेपूर्वीच वळसे पाटलांनी या तारखा सांगितल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, येत्या ५ नोव्हेंबरला नगरपालिका (Nagarpalika) आणि नगरपंचायत (Nagar Panchayat) निवडणुका जाहीर होतील. तसेच, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महापालिका (Municipal Corporation) निवडणुका जाहीर होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण कराव्यात, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement