Poll Date Politics: '15 जानेवारीला मतदान होईल', Dilip Walse Patil यांनी निवडणूक आयोगाआधीच तारखा सांगितल्या!

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Elections) संभाव्य तारखा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. '15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होईल', असा थेट दावा वळसे पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच त्यांनी हे भाष्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. वळसे पाटील यांच्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबरला नगरपालिका (Nagarpalika) आणि नगर पंचायतीच्या (Nagar Panchayat) निवडणुका जाहीर होतील. तसेच, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola