NCP Now Regional Party : राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रादेशिक पक्ष, निवडणूक आयोगाचा NCP ला धक्का

Continues below advertisement

शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.. राष्ट्रवादीच्या ईशान्य भारतात झालेल्या पराभवानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाय.. एखाद्या पक्षानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला, तर त्या पक्षाला मान्यता नसलेल्या राज्यात प्राधान्यानं पक्षचिन्ह मिळू शकत नाही. त्यामुळं कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि तृणमूलला आपल्या चिन्हांवर निवडणूक लढवत येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगानं आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा देऊन त्यांचं झाडू हे पक्षचिन्ह कायम ठेवलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram