Rupali Thobare VS Rupali Chakankar :चाकणकर-ठोंबरे वाद पेटला, अजित पवारांच्या भेटीनंतर काय घडणार?

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) आणि रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यातील वाद आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. 'सर्व आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार,' असं रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर ठामपणे सांगितले. पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आपण या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याने आता हा वाद मिटणार की आणखी चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola