NCP Foundation Day : राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन; शरद पवार नगरमध्ये, अजित पवार मुंबईत साजरा करणार

Continues below advertisement

NCP Foundation Day : राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन; शरद पवार नगरमध्ये, अजित पवार मुंबईत साजरा करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP Foundation Day)  यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळं असणार आहे. कारण या पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत.फुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन आहे. त्यातही अजित पवार यांनी नुकतंच वर्धापनदिन सोहळा धडाक्यात साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar)  यांनी पक्षाचा 10 जून रोजी होणारा वर्धापनदिन सोहळा जोरदार साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. लवकरच हा सोहळा दिल्लीत,  मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा केला जाणार याबाबत देखील घोषणा होणार आहे.   यंदाचं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचं आहे कारण यंदा पक्षाचा 25 वा वर्धापनदिन सोहळा आहे. परंतु पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांना काही कालावधी पुरते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे.  तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावासह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच अजित पवार यांच्यावतीने वर्धापन दिन साजरा आपण जोरदार साजरा करणार असल्याचं म्हंटलं आहे. सध्या पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी कोर्टाने कोठेही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बंदी घातली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram