Local Body Polls: नागपूर मनपा आरक्षण जाहीर, दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार?
Continues below advertisement
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी १५१ जागांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ३०, अनुसूचित जमातींसाठी १२ जागा आणि महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये (Chandgad) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गटांनी एकत्र येत युती केली आहे. 'भाजपा (BJP) सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती चालेल', अशी भूमिका शरद पवार यांच्या पक्षाने जाहीर केल्यानंतर ही पहिलीच मोठी राजकीय घडामोड आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement