Dhananjay Munde Grand Welcome | धनंजय मुंडे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत

Continues below advertisement

औरंगाबाद : एखाद्या राजकीय नेत्याच्या समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे औरंगाबादमध्ये दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी इथं मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. शिवाय मुंडेंप्रती कार्यकर्ते आणि समर्थकांचं प्रेम इथं एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळालं.

धनंजय मुंडे या ठिकाणी दाखल होताच त्यांना एक भव्य हार घालण्यात आला. या हाराचा आकार इतका मोठा होता, की तो घालण्यासाठी तिथं क्रेनचा वापर करण्यात आला. एखादी निवडणूक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे जल्लोष केला जातो अगदी तसाच जल्लोष औरंगाबादच्या चिखलठाण्यामध्ये मुंडे यांच्या येण्यानं पाहायला मिळाला. बीडहून इथं आले असता त्यांचं असं धमाकेदार स्वागत करण्यात आलं.

आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मुंडेंवर काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर स्वरुपात बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. ज्यानंतर आरोप करण्याऱ्या महिलेनं काही दिवसांनी हे आरोप मागेही घेतले. याचे थेट परिणाम म्हणजे विरोधकांनी मुंडेंवर निशाणा साधण्यास सुरुवात केलेली असतानाच त्यांच्या बाजूनं येणाऱ्या सहानुभूतीपूर्ण प्रतिक्रियांचं प्रमाण झपाट्यानं वाढलं. अखेर कारकिर्दीतील बे वादळ नाहीसं झालं आणि सारं चित्र पालटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram