NCP Crisis : कुणाला घड्याळ?, कुणाला काटा? ; पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी

Continues below advertisement

राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या सुनावणी आज पार पडणार आहेत... एक म्हणजे शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलाय. आमदार अपात्रतेच्या संदर्भात शरद पवार गटाने याचिका दाखल केलीय... याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणारे.. तर दुसरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणारे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने युक्तिवाद करताना, शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला असा आरोप करत परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटाने पक्षाचं चिन्ह गोठवू नये अशी मागणी आयोगाकडे केलीय. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दोन्ही सुनावणींकडे सगळ्यांचे डोळे लागलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram