Sharad Pawar | Palghar Mob Lynching | पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका : शरद पवार
पालघर प्रकरणावरून राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना पालघर प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पालघरमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालघरमध्ये घडलेली घटना आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका, असं आवाहन पवार यांनी बोलताना केलं आहे.