Gondia : भंडारा आणि गोंदियात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी - भाजपमध्ये युती
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झालीय. भंडाऱ्यात राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेसनं भाजपच्या एका गटाशी युती केलीय. तर गोंदियात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यात जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष भाजपचा असा समझोता झालाय. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपचे संदीप ताले यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. तर गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काँग्रेसला एकटं पाडलं. तिथं अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर यांनी अर्ज दाखल केलाय. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21, भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 13 आणि शिवसेनेचा एक असं संख्याबळ आहे.