Maharashtra Politics: छगन भुजबळांना धक्का! माणिकराव कोकाटेंना Nashik, Dhule, Jalgaon ची जबाबदारी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल दिसून येत आहेत, ज्यात आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना बाजूला सारण्यात आल्याची चर्चा आहे. 'पक्ष मजबूत करा आणि निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश मिळवा,' अशा सूचना देत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कोकाटेंची नियुक्ती केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नाशिक (Nashik), धुळे (Dhule) आणि जळगाव (Jalgaon) या तीन जिल्ह्यांची जबाबदारी माणिकराव कोकाटेंच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ते या जिल्ह्यांसाठी पक्षाचे संपर्कमंत्री म्हणून काम पाहतील. नाशिकचे असूनही छगन भुजबळ यांच्याऐवजी कोकाटेंना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola