NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वी

Continues below advertisement

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वी

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे.  भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीने 236 जागा जिंकल्या. 

विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार अशी माहिती देखील समोर आली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram