ZP Members | सोलापुरात मोहिते गटाच्या सहा झेडपी सदस्यांचं निलंबन | ABP Majha
सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली आहे. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व सदस्य माळशिरस तालुक्यातून असून मोहिते-पाटील गटातील आहेत.