NCERT Map Row NCERT पुस्तकातील नकाशावरून वाद,अभ्यासक्रमात मराठ्यांच्या पराक्रमाची गाथाSpecial Report

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) च्या इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातील मराठा साम्राज्याच्या नकाशावरून वाद निर्माण झाला आहे. या नकाशात जैसलमेर, मेवाड, बुंदी यांसारख्या भागांना मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आले आहे. जैसलमेरच्या राजघराण्यातील सदस्य चैतन्यराज सिंग यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मैं एनसीईआरटी द्वारा प्रकाशित ऐतिहासिक पुस्तकों का विरोध करता हूँ। इन पुस्तकों में एनसीईआरटी द्वारा भारत के अन्य राजवंशों को कमतर दिखाने की कोशिश की गई है। राजपुताना की संपूर्ण रियासतों को एक कपोल कल्पित मराठा साम्राज्य का हिस्सा दिखाने की कोशिश की है। यह कार्यवाही ऐतिहासिक और कानूनी दोनही तौर पर गलत है। ऐसा लगता है कि एनसीईआरटी जिसे करोड़ों रुपये सरकार से अनुदान में प्राप्त होते हैं, वह अपना इतिहास का ज्ञान सिनेमा से प्राप्त करत है।" मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार होता, असे मराठा वंशजांचे म्हणणे आहे. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याने १७५८ मध्ये अटकेचा किल्ला जिंकून भगवा फडकवला होता. भोसले घराण्यातील वंशजांनी मुघलांशी झालेल्या करारांचा दाखला देत राजस्थानचा भूभाग मराठा साम्राज्याचा भाग झाल्याचे सांगितले. रघुजी महाराजांनी ओरिसा, बिहार, बंगाल, युपी, एमपी, छत्तीसगढ आणि गोंडवाना हे भाग मराठा साम्राज्याच्या अधीन केले होते. पुस्तकात 'राजपूत' शब्दाचा वापर १५ वेळा, तर 'मराठा' शब्दाचा वापर ९४ वेळा झाल्याचाही आक्षेप आहे. राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांकडे या संदर्भाचा तात्काळ अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतिहास संशोधक सदानंद मोरे यांचेही मत यावर महत्त्वाचे आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola