NCB Raid Mumbai: भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून देण्यात आलं - नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
NCP विरुद्ध NCB हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB च्या अधिकाऱ्यांवर क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं असल्याचा गंभीर आरोप केला आहेत. यात एक भाजप नेत्याचा मेहुणा होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. याबाबत मी खुलासा करणार आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.