Nawab Malik on Governor Koshyari : आपण मुख्यमंत्री नाही, हे राज्यपालांनी समजून घ्यावं : नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारनं पहिल्यांदाच राज्यपालांच्या दौऱ्यावरुन थेट हल्लाबोल केलाय... राज्यपाल ५ ते ७ ऑगस्टदरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी दौऱ्यावर आहेत... आणि हाच दौरा नियमांना धरुन नाही, आणि राज्यपाल कोश्यारींकडून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात वारंवार हस्तक्षेप केला जातोय... आणि सरकारनं केलेल्या कामांचं राज्यपालांकडून परस्पर उद्घाटन करण्याचं काम केलं जातंय... तर,  राज्यपालांकडून सत्तेची दोन केंद्रं बनवण्याचा प्रयत्न केला जातोय... अशी जोरदार टीका महाविकास आघाडी सरकारनं केलाय... तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील याआधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेयत... त्यामुळे आपण आता मुख्यमंत्री नाही तर राज्यपाल पदावर आहात हे भगतसिंह कोश्यारी यांनी समजून घ्यावं... अशी घणाघाती टीका नवाब मलिकांनी राज्यपालांवर केलीय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola