Nawab Malik : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत सरसकट आघाडी नाही : नवाब मलिक ABP Majha
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेस नेते करतायत. तर सरसकट महाआघाडी होणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. पुढच्या काही महिन्यांत राज्यात १४ महापालिकांच्या आणि अनेक जिल्हा परिषदांच्याही निवडणुका आहेत. या निवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार कोणासोबत जायचं याचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.