Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

भाजपचे नेते विरोधात बोलतात.. दादा हे मर्द माणूस आहे जो शब्द दिला तो पाळतात.. दादांचे आभार मानतो ज्या विश्वासाने तुम्ही उमेदवारी दिली आहे..ही जागा आम्ही निवडणून आणू.. जनता आमच्या पाठीशी  ----------------------------------------  भाजपचा विरोध झुगारून आपल्याला उमेदवारी दिली आणि आता प्रचारात देखील उतरणार आहे  अजित पवार हा मर्द माणूस आहे. तो जो शब्द देतो तो शब्द दादा पाळतो. आमच्या कठीण काळात पाठीशी उभा राहिला आणि आम्हाला उमेदवारी देखील दिली. आता महायुती आणि महाविकास आघाडी माझ्या विरोधात आहे मात्र जनता माझ्या सोबत आहे.  एका म्यानात २ तलवारी तुमच्या मतदारसंघात आहे. २ महायुती उमेदवार मी महायुती उमेदवार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे.   मुस्लिम धर्मगुरुचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवारांसोबतच्या मुस्लिमाना सोशाली बायकॉट करा  पैसे घेऊन काहीजण असे व्हिडीओ करत आहे. नवाब मलिकांना धर्माच्या आधारे थांबवण्याचा हा प्रकार आहे. परंतु मी धर्मावर राजकारण करत नाही. शिव शाहू फुले आंबेडकर आमची विचारधारा आहे  ऑन सदाभाऊ खोत यांची वक्तव्य बालिश आहेत. यांना राजकारणात कुठेच स्थान नाही. म्हणून प्रसिद्धीसाठी अशी विधाने करतात. विवादित बोलून पक्षाला कोणताच फायदा होत नाही. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढा वादग्रस्त वक्तव्य करुन नाही  शरद पवार फेक नरेटिव्हचे जनक तर सुप्रिया सुळे डिरेक्टर- देवेंद्र फडणवीस - ⁠घटना बदलणं हे नरेटिव्ह भाजपच्या लोकानी केलेल्या विवादित विधानामुळे झाले आहे. तुम्ही बोलताना भान ठेवत नाही. तुम्ही पोलाराइज करण्यासाठी जेव्हा राजकारण करता तेव्हा काऊंटर पोलाराईज होणार आहे. त्याचा अंदाज तुम्हाला मागच्या निवडणुकीत आला आहे. भावनेच्या आधारे राजकारण करू नका  जब जब बेटेंगे तब तब कटेंगे- योगी हे विधान अतिशय वाह्यात आहे. अशा वाह्यात वक्तव्यामुळेच उत्तर प्रदेश मधे त्यांचा पराभव झाला आहे.  ऑन राज ठाकरे - शरद पवार जातीय राजकारणाचे जनक आहेत मोठ्या नेत्यांचा विरोधात बोलल्या शिवाय काही लोकांना मीडिया छापत नाही. त्यासाठी अशा नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य करावी लागतात. माझं त्यांना सांगण आहे वादविवाद करुन तुम्हाला प्रसिद्धी मिळेल मतं मिळणार नाहीत.  ऑन अबू आझमी माझा जावई समीर आता आमच्यासोबत नाही. एखादी केस एखादा व्यक्ती गेल्यानंतर संपते मात्र आम्ही ती केस संपली हे कधीच स्वीकारणार नाही. आम्ही कोर्टासमोर ती केस व्यवस्थित लढवणार आहे. त्यांच्यावर असलेला ठपका पुसल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अबू आझमी मृत झालेल्या माणसाबाबत बोलत आहेत. हे चुकिच आहे. मी बोलायला सुरूवात केली तर त्यांना जड जाईल. त्यांच्या भावाचा मुलगा काय करतो. तो कुणाचा राईट हैंड आहे. इंटरनॅशनल ड्रग्ज माफिया कोण कुठं आहे हे सगळं मी उघड करू शकतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola