Nawab Malik on CM : प्रादेशिक पक्षांची मोट बांधली पाहिजे याचेच ठाकरेंच्या भाषणात संकेत : नवाब मलिक

Continues below advertisement

मुंबई : काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram