Nawab Malik यांची Osmanabad मधील 148 एकर जमीन जप्त, ED कडून 8 मालमत्तांवर जप्तीची कारवाई

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ED ने पुन्हा एकदा दणका दिला आहे. ईडीने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्या आठ संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता बहुतांश मुंबईतील आहेत. यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola