Navratri 2021 : वणीच्या सप्तश्रृंगी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरु, 7 ऑक्टोबरपासून मंदिर 24 तास सुरु

Continues below advertisement

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावरही आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरु करण्यात आलीए. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु होणार आहेत. त्यामुळे 7 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवातही वणी येथील सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरु राहणार आहे. पासशिवाय कुणालाही मंदिरप्रवेश दिला जाणार नाही. पास मिळवण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आलाय. नवरात्रीत नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरवण्यावर बंदी घालण्यात आलीय. याकाळात खासगी वाहनांनाही गडावर बंदी असेल. तर तिकडे नांदुरी गडावर जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram