Navneet Ravi Rana Update : जामीनाच्या अटीशर्तींचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन नाही, राणांचं कोर्टात उत्तर
राणा दाम्पत्याला १५ जूनपर्यंत दिलासा मिळालाय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा जामीन फेटाळण्याच्या अर्जावरील सुनावणी लांबणीवर गेलीय. जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात उत्तर दिलं. माध्यमांशी संवाद साधताना तुरुंगात असताना १२ दिवस सहन कराव्या लागलेल्या यातना, ओढावलेला प्रसंग राणा दाम्पत्याने सांगितला. या प्रकरणाशी कोणत्याही मुद्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे कोर्टाच्या कोणत्याही अटींचा भंग झाला नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केलाय