Navneet Rana : 'मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून, हिम्मत असेल तर...' नवनीत राणांचा शिवसेनेला इशारा
Continues below advertisement
Amravati : देशासह राज्यात सुरु असलेल्या भोंग्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Continues below advertisement