Navneet Rana : तुम्ही फक्त मतदारसंघ सांगा, मी स्वत: विरोधात उभी राहीन,राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Continues below advertisement

Maharashtra News : राजद्रोहाचं कलम स्थगित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात राणा दाम्पत्यानं दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली. त्यामुळे सगळी संकटं दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा वाचली, तर आमच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असं ते म्हणाले. राजद्रोहाचं कलम हे इंग्रजांच्या काळातील. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कलमांचं पालन करतंय, हे दुर्देव, असल्याची खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram