Navneet Rana : अमरावतीची 2024 पर्यंत आणि त्यानंतरही खासदार मीच राहणार, नवनीत राणांची प्रतिक्रिया
अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, तिथे न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.