Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला अजामीनपात्र वॉरंट पाठवा, पोलिसांची न्यायालयात मागणी
हनुमान चालिसा प्रकरणी जामिनावर बाहेर असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी पोलिसांनी केलीय. राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नसल्याचा आरोप सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयानं घातली आहे. पण राणा दाम्पत्यानं त्याचं उल्लंघन केल्याचं सांगत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी कोर्टात करण्यात आलीय. राणा दाम्पत्य एकदाही कोर्टात हजर राहिले नसल्याकडेही राज्य सरकारच्या वकिलांनी लक्ष वेधलं.