Navneet Rana Ravi Rana Marriage : राणा दाम्पत्याच्या लग्नाची गोष्ट, काय आहे कहाणी? ABP Majha
दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून करीयरला सुरुवात केलेल्या नवनीत कौर अर्थात नवनीत राणा पुढे खासदार झाल्या आणि सध्याच्या स्थितीला अमरावतीतल्या फायर ब्रॅंड अशी ओळख निर्माण झालेल्या नवनीत राणा. आता नवनीत राणा हे नाव जरी निघालं तरी डोळ्यासमोर लगेच येतं ते हनुमान चालिसा पठणासाठी भांडणारं राणा दाम्पत्य. कोणत्या विकास कामाच्या आग्रहाखातर नाही तर चक्क हनुमान चालिसा म्हणण्यासाठी थेट मातोश्री गाठणारं हे राणा दाम्पत्य आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलंय. त्यानंतर या जोडीला तुरंगात जावं लागलं हा भाग वेगळा पण ही अपक्ष आमदार - खासदार नवरा - बायकोची जोडी तेव्हापासून चांगलीच चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीये का, की या दोघांची भेट कशी झाली? पुढे त्याचं लग्नात रुपांतर कसं झालं? याच लग्नाची गोष्ट सांगणारा हा व्हिडीओ!
Tags :
Maharashtra Mla Ramdev Baba Ravi Rana Wedding Ceremony Navneet Rana Hanuman Chalisa Shamal Bhandare Rana Couple