Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला दिल्लीतून बोलावणं, भाजप नेत्यांनी धाडला आदेश! ABP Majha

Continues below advertisement

अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वेळणावर गेल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली. 45 पेक्षा जास्त जागांवर निवडून विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, राज्यातील महायुतीच्या पराभवाचा स्वीकार करुन आपण उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यासाठी, आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, फडणवीसांच्या या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असायलाच हवेत अशी भूमिका भाजपच्या आमदार व नेत्यांनी घेतली आहे. त्यातच, दुसरीकडे अमरावतीत भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन येथील शहर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.  
अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला असून येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन भाजपच्या प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर भाजपात पहिला राजीनामा पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ''उपरोक्त विषयान्वये, मी अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्याचा स्विकार करावा, हि विनंती,'' असे पत्र प्रवीण पोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांती पराभवाचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram