Navi Mumbai Airport :दि.बा.पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळाबाहेर मोठा फलक

Continues below advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज लोकार्पण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामांकनासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. सर्वपक्षीय आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले होते. राज्य सरकारने अखेर दिबा पाटील यांच्या नावाला मान्यता दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या नावाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील भूमिपुत्रांनी दिबा पाटील यांच्या नावासाठी संघर्ष केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिबा पाटील यांच्या नावाला समर्थन दिले आहे. सध्या विमानतळाच्या ठिकाणी 'लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई' असा अधिकृत बोर्ड लावण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील आणि त्यावेळी हे विमानतळ दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नावाने ओळखले जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola