Navi Mumbai Fire : वाशीतील Raheja Residency मध्ये भीषण आग; चिमुरडीसह चौघांचा मृत्यू
Continues below advertisement
नवी मुंबईच्या वाशीतील रहेजा रेसिडेन्सीमध्ये (Raheja Residency) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका सहा वर्षीय मुलीसह चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (Vedika Sundar Balakrishnan), पूजा राजन (Pooja Rajan), सुंदर बालकृष्णन (Sundar Balakrishan) आणि कमला जैन (Kamala Jain) यांचा समावेश आहे. 'दहाव्या मजल्यावरच्या घरातील एका आजीचा तर बाराव्या मजल्यावरच्या घरामध्ये आई वडील आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे', अशी माहिती समोर आली आहे. वाशीमधील सेक्टर १४ येथील एमजी कॉम्प्लेक्समधील (MG Complex) या इमारतीच्या १०व्या, ११व्या आणि १२व्या मजल्यावर ही आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र या दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या आगीच्या कारणाचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement