Navi Mumbai Mahapalika Election : खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे? प्रशासकीय राजवटीला नागरिक वैतागले

Continues below advertisement
नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असल्याने शहराचा विकास रखडल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 'भ्रष्टाचार मात्र एकदम शेवटच्या टोकावर आहे आणि महापालिकेचे अधिकारी अत्यंत गलथान कारभार करत आहेत', अशा शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याची समस्या, पार्किंगचा अभाव आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असून, तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका (NMMC Elections) घेऊन नगरसेवक निवडून देण्याची जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात (Swachh Survekshan) शहराला देशात तिसरा क्रमांक मिळाला असला तरी, प्रत्यक्षात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola