Nanded Flood: पुराच्या पाण्यातून प्रवास करत नवरदेव मंडपात ABP Majha
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहतात. परिणामी अनेक गांवाचा संपर्क तुटलाय. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी इथल्या नवरदेवाला चक्क महापुरातून प्रवास करावा लागला. बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेव नदीच्या प्रवाहातून प्रवास करत लग्न मंडपात पोहोचला. तर वऱ्हाडी मंडळीही जीव मुठीत घेऊन लग्नासाठी पोहोचले... उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली इथली ही घटना आहे.
Continues below advertisement