Pune Smriti Irani: पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादी काँग्रसचं आंदोलन ABP Majha
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना आज महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज त्यांच्यासमोर महागाईविरोधात आंदोलन केलं. स्मृती इराणी हॉटेलवर पोहोचायच्या आधीच त्यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. यूपीए सरकारच्या काळात महागाईविरोधात आंदोलनात स्मृती इराणी आघाडीवर होत्या. त्यामुळे आता वाढलेल्या महागाईविरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं. स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. पण भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना रोखलं.
Tags :
Pune Smriti Irani Union Minister Sloganeering BJP Activists Mahila Congress Agitation Against Inflation