NSE Threat | 4 बॉम्ब ठेवलेत, NSE ला पुन्हा धमकीचा मेल

नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (National Stock Exchange) धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (National Stock Exchange) देखील त्याच ईमेलहून धमकीचा मेल आल्याची घटना समोर आलेली आहे. हा ईमेल 'Comrade Pinarayi Vijayan' या नावानं पाठवण्यात आला आहे. "नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत चार बॉम्ब ठेवले असून ते लवकरच फुटणार असल्याचा धमकीवजा मेल आलेला आहे." असा मजकूर या मेलमध्ये आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस (BKC Police) ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या (Cyber Police) मदतीनं पोलिस या मेल पाठविणाऱ्या व्यक्तिचा शोध घेत आहेत. ही घटना गंभीर असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या धमकीच्या मेलमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola