Carrom Competition : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना विजेतेपद तर मुलींना उपविजेतेपद
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 07:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या दादरमध्ये आयोजित ४७व्या ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मुलांनी विजेतेपदाचा आणि मुलींनी उपविजेतेपदाचा मान मिळवला. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं विदर्भवर ३-० असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या मिहीर शेख आणि कौस्तुभ जागुष्ठेनं एकेरीच्या लढती जिंकल्या, तर महाराष्ट्राच्या अथर्व पाटील आणि एस. आर. रफिकनं दुहेरीची लढत जिंकली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं बलाढ्य तामिळनाडूकडून ०-३ अशी हार स्वीकारली.