Nashik Rain : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, नाशकात टोमॅटो पिकांचं नुकसान ABP Majha
ऐन थंडीत आलेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला झोडपून काढलंय, नाशिक त्रंबकेश्वर, देवळा भागात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालाय कांदा भाजीपाला सह टोमॅटो पिकाला अवकाळीचा फटका बसलाय, टोमॅटोवर रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात असून पान करपण्यास सुरवात झाली आहे आधीच टोमॅटो ला भाव नाही त्यात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय त्रंबकेश्वर तालुक्यातील टोमॅटो शेतातून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी