Nashik Train Accident: छठ पूजेसाठी बिहारला जाणाऱ्या २ तरुणांचा कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून मृत्यू.

Continues below advertisement
नाशिकजवळ एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे, ज्यामध्ये मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे. 'गाडीतून पडून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय,' असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर घडली. हे तरुण छठ पूजेसाठी आपल्या गावी जात होते, असे समजते. दिवाळी आणि छठ पूजेमुळे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, गर्दीमुळे तोल जाऊन हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola