Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले

Continues below advertisement

Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
 आणि यानंतर आपण नाशिक मधल्या तपोवन परिसरामध्ये जाऊयात. तपोवनातल्या झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन सुरू झालेल आहे. एसटीपी प्लांटसाठी तीनशेर झाडांवरती कुराड चालवण्यात आलेली आहे आणि त्या विरोधात आता पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत. नाशिकमधल्या तपोवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली गेलेली आहेत. तर साधुग्रामसाठी इथल्या 1800 झाडांवरती कुराड चालवली जाणार होती. त्याविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले होते. आणि आता ज्या 300 झाडांवरती एसटीपी प्लांटसाठी कुराड चालवली गेलेली आहे. त्या विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत. ज्या हरकती नोंदवल्या गेलेल्या होत्या त्याची दखल घेण्यात आली नाही असं यांच म्हणण आहे. कुंभमळाच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील काही झाड तोडली जाणार होती त्या विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले होते आणि आता झाडावरती चढून हे आंदोलन केल जातय ही दृश्य सध्या आपण तपोवनातली पाहतोय 300 झाड तोडली गेलेली आहेत एसटीपी प्लांटसाठी. सांड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत नाशिक मध्ये अन्य ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत आणि इथली काही झाड तोडली गेलेली आहेत 300 झाड तोडली गेलेली आहेत. मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील. मुकुल 300 झाडांच्या कत्तलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. नेमक काय घडतय तिथे? आता. आपण बघतोय साधुग्रामची जी जागा आहे तपवनातली त्याच्याच पुढचा हा भाग आहे इथे एसटीपी प्लांट ची उभारणी केली जाणार आहे त्याचं काम देखील सुरू झालेल आहे मात्र त्यासाठी या परिसरामधील 447 झाडं ही तोडण्या संदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातन जाहिरात देण्यात आलेली होती. समोर जे झाड आपण बघतोय त्या झाडावर नंबर देखील लावण्यात आलेले आहेत की या झाडांची पहिले गणना करण्यात आली होती आणि त्यातील काही झाडं ही वाचवण्यात आलेली आहे. आहेत 300 झाड ही तोडण्यात आलीची अधिकृत माहिती नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती त्याचबरोबर उद्यान विभागाच्या माध्यमातन देण्यात आलेली आहे. ही झाड तरी काही ठिकाणी दिसतायत मात्र पलीकडे जर आपण बघितलं तर असे झाड तोडून त्या लाकडांचे ढगच्या ढीग इथे जमा झालेले आहेत काहींचे खोड इथे बाजूला करण्यात आलेले आहेत हे जे लाकड आहेत ते आजूबाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते त्यांच्या सर्पणासाठी किंवा इतर कारणासाठी वापरतात परंतु महत्त्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिकेने ही जाहिरात दिलेली होती, त्याची नाशिकमधील पर्यावरण प्रेमींना माहिती नव्हती असा दावा त्यांच्याकडन केला जातोय. रीतसर नाशिक महानगरपालिकेने वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात जाहिरात दिलेली होती आणि त्यानंतर वृक्ष तोड करण्यात आलेली आहे आणि एसटीपी प्लॅंटच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काम देखील जोमा सुरू झालेल आहे. परंतु ही अशी जी डेरेदार वृक्ष आहे यातील बहुतांश वृक्ष ही तोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण आता नवा... निर्माण झालेला आहे. एका बाजूला साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोड करावी लागणार त्यातील एकही वृक्षाला हात लावू देणार नाही अशी भूमिका पर्यावरण प्रेमींनी घेतलेली असताना आता नवीन मुद्दा समोर आलेला आहे. एसटीपी प्लांटसाठी जवळपास 300 झाडांची कत्तल करण्यात आली आणि ह्या झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत. महापालिकेचा एक विभाग सांगतोय आम्ही यातील काही झाडं ही लावलेली आहे. 7 हजारांच्या आसपास झाडं लावल्याचा दावा देखील काही अधिकाऱ्यांकडने केला जातोय मात्र ती झाडं नेमकी कुठे लावली याचा शोध. आता पर्यावरण प्रेमी घेणार आहेत. बरोबर आहे. सध्या आपण दृश्य पाहतोय आंदोलन सुरू झालेला आहे. मुकुल जी झाड तोडली गेलेली आहेत. त्या झाडांच्या बदल्यात नवीन झाड लावली जातील असा आश्वासन दिलं गेलेल आहे. पण त्याची काही अंमलबजावणी सुरू झाली आहे का? कुठे कुठे हे वृक्षारोपण झाले? त्यासंदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? अद्याप या संदर्भात महापालिकेकडन अधिकृत माहिती मिळालेली नाहीये मात्र काही पर्यावरण प्रेमीशी चर्चा. केल्यानंतर त्यांना माहिती देण्यात आलेली होती की यातील ही झाड तोडलेली आहेत परंतु नव्याने झाड देखील आम्ही फाशीचा डोंगर, सातपूर परिसर अशा भागामध्ये लावलेली आहे, त्यामुळे आता नेमकी ती झाड कुठून खरेदी केलेली होती, एका झाडामागे किती पैशाचा खर्च आलेला आहे, ती झाड कधी लावली अशी असंख्य प्रश्न अनुतरित आहेत, याचा खुलासा नाशिक महानगरपालिका प्रशासन ज्यावेळेस करेल त्याच वेळेस खुलासा होऊ शकतो आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती नेमकी काय आहे? जिथे महापालिका सांगते इथे वृक्षारोपण.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola