Nashik Shocker: भाऊबीजेला लोकार्पण, गर्दीमुळे मोडतोड, 3 दिवसांत Pramod Mahajan उद्यान बंद!
Continues below advertisement
नाशिकमधील (Nashik) प्रमोद महाजन उद्यानाच्या (Pramod Mahajan Udyan) लोकार्पणावरून वाद निर्माण झाला असून, आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांच्या उपस्थितीत भाऊबीजेला उद्घाटन झालेले उद्यान तीन दिवसांतच बंद करण्याची नामुष्की ओढवली. भाऊबीजेच्या दिवशी लोकार्पण होताच उद्यानात झालेल्या प्रचंड गर्दीमुळे तिथल्या खेळण्यांची मोडतोड झाल्याने उद्यान बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) २ नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक कामामुळे उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण झालेल्या या उद्यानात लहान मुलांसाठी खास रबर सोलिंग, ३५०० झाडे आणि विविध खेळण्यांची सोय करण्यात आली होती, जे गर्दीमुळे खराब झाल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement