Nashik : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत हजारो किलो जप्त, बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला खुलासा
Continues below advertisement
Nashik : सेंट्रल किचन योजनेतील अडीच ते तीन वर्षांपूर्वीचा जवळपास 14 हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 13 ठेकेदांराना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. त्यातील एका ठेकेदाराने तांदूळ दडवून ठेवलेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आला. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणी दौऱ्या दरम्यानच महिलांकडून भांडाफोड करण्यात आला. पोषण आहार बंद असताना तांदूळ शासनाला जमा का करण्यात आला नाही. अडीच तीन वर्षे दडवून का ठेवण्यात आला. या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, यंसदर्भातील अहवाल मनपा आयुक्तांना शिक्षण विभाग पाठवणार असून पुढील करावाई केली जाणार आहे.
Continues below advertisement