Nashik : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीचं टेन्शन, तिकीट कापल्यानं अनेकांमध्ये नाराजी
Nashik : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीचं टेन्शन, तिकीट कापल्यानं अनेकांमध्ये नाराजी
एकीकडे नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचार, मेळाव्यांना जोरदार सुरुवात केलेली असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचेच नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. करंजकर वाजेंच्या कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावत नाहीत. करंजकर ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी, देवदर्शन घेताना दिसून येतायत, त्यामुळे करंजकरांचे नक्की काय ठरलंय हा प्रश्न आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेही तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढवण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवतेही बंडखोरी करत वंचितकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतायत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचं टेन्शन वाढलं आहे.