Nashik Rain : नाशकात वादळी वाऱ्यासह पाऊस, बस टर्मिनलचं शेड कोसळलं... ABP MAJHA
Nashik Rain : नाशकात वादळी वाऱ्यासह पाऊस, बस टर्मिनलचं शेड कोसळलं... ABP MAJHA
रविवारी दुपारी सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सिन्नर बसस्थानकाचा प्लँटफॉर्म 1 ते 6 चा स्लॅब चा काही भाग आणि शेड खाली कोसळली आहे, प्लँटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बस आणि एका चारचाकी वर स्लॅब चा भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले सुदैवाने यात कोणीही जखमी नाही. अजूनही बस स्थानकाचा धोकादायक भाग खाली कोसळण्याची शक्यता असल्याने बसस्थानकाचा निम्मा भाग बंद करण्यात आला आहे, प्रवाश्यांना यां भागात बाजाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां संकल्पनेतूनच विकासक असणारे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या माध्यमातूनच 2011 मध्ये बस स्थानक उभारण्यात आले होते मात्र 13 ते 14 वर्षताच प्लँटफॉर्मवरील शेड चा काही भाग कोसळल्याने कामाच्या दर्जा बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धोकादायक भाग काढून मलबा हटविला जाणार आहे