Nashik IT Raid : नाशकात आयकरचा मोठा छापा, पैसे मोजण्यासाठी लागले 14 तास! ABP Majha

Continues below advertisement

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्स या दुकानात आयकर विभागाच्या पथकाने धाडसत्र सुरू केले. या धाडसत्रामध्ये सुरणा ज्वेलर्समध्ये आणि कार्यालयात तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सुराणा ज्वेलर्स यांच्या निवासस्थानी देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. सुराणा यांच्या बांधकाम व्यवसायिकांशी संबंध असल्याचे देखील माहिती आयकरच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर केलेला झाडाझडतीत तब्बल 26 कोटी रुपये कॅश, तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांचे दस्तऐवज पथकाच्या हाती लागले.  

नाशिकमध्ये एका बड्या सराफ व्यावसायिकावर आयकर विभागाने धाड टाकली. गुरुवारी सायंकाळी आयकर विभागाचे पथक नाशिक मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर विविध ठिकाणी आयकर विभागाच्या या पथकाने धाडसत्र सुरू केले. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्स या ठिकाणी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आणि सुराणा ज्वेलर्स दुकानात अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram