Nashik Crime: म्होरक्या प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडले गुप्त भुयार, नवे रहस्य उघड

Continues below advertisement
नाशिकमधील सातपूर (Satpur) गोळीबार प्रकरणानंतर 'लोंढे टोळी' (Londhe Gang) आणि तिचा म्होरक्या प्रकाश लोंढे (Prakash Londhe) पोलिसांच्या रडारवर आहेत. 'नाशिक पोलिसांनी गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या घर झडतीत पोलिसांना त्याच्या कार्यालयात भुयारी घर सापडून आले आहे. ' या मोठ्या आणि गुप्त भुयारामुळे (Secret Bunker) खळबळ उडाली आहे. पोलीस आता या भुयाराचा वापर कशासाठी केला जात होता, याचा तपास करत आहेत. या टोळीने परिसरात दहशत निर्माण करून खंडणी आणि इतर गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. प्रकाश लोंढे आणि त्याच्या साथीदारांवर असलेल्या इतर गुन्ह्यांचीही पोलीस कसून चौकशी करत असून, या कारवाईमुळे नाशिकमधील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola