Nashik Police Action: Nashik मध्ये गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
Continues below advertisement
नाशिक शहरात अनधिकृत टपऱ्या आणि दुकाने हटवण्याची कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनली होती. नाशिक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी थेट रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला असलेले अनधिकृत बांधकाम देखील हटवले आहे. वाढत्या गुन्हेगारीनंतर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत अनधिकृत टपऱ्या हटवण्याचे काम सुरू आहे. पणछोटी आणि आरटीओ परिसरातही ही कारवाई सुरू आहे. "आज नाशिक पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीने जे गुन्हेगारांचे आश्रय घेण्याचे अड्डे होते किंवा ज्या ठिकाणी ते अनधिकृतरित्या दारू पिऊन बसत होते अशा सर्व ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने पाऊल उचललेलं आहे। त्यातील आजचा हा पहिला टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या अशा गुन्हेगारांचे अड्डे या ठिकाणी नष्ट करायचा प्रयत्न करत आहोत," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अनधिकृत टपऱ्या आणि दारू पिणाऱ्या गुंड लोकांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement